महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यामतून ते तरुणांना आणि त्यांच्या अनोख्या समाजोपयोगी प्रयत्नांना प्रोत्साहन देत असतात. तसेच देशात सुरू असलेल्या चांगल्या कामाचं कौतुकही ते जाहीरपणे करत असतात. पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांचे एक ट्वीट चर्चेत आले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ ट्विट करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे एक विनंती केली आहे. महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून एक नदी वाहत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून जाणारी वाहने आणि पुलावरून वाहणारी नदी दिसत आहे. रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडेही दिसत आहेत. व्हिडिओमधील हे दृश्य मनमोहक असून आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे की, ‘नितीन गडकरीजी आपणही असे करू शकतो का?’
Wait…What?? Can we do this too, @nitin_gadkari ji? 😊 pic.twitter.com/SNjRry5rup
— anand mahindra (@anandmahindra) June 12, 2023
हे ही वाचा:
‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!
जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार
दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स, युट्युब चॅनेल्सवर बंदी
व्हिडीओमध्ये दिसत असलेला हा अनोखा ब्रिज देशात निर्माण करता येईल का? असा प्रश्न त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना विचारला आहे. त्यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया येत असून आता नितीन गडकरी याला काय उत्तर देणार याकडे लक्ष असणार आहे.