‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा

‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्र हे नेहमीच तळागाळातील लोकांना मदतीचा हात देण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर एका १९ वर्षीय तरुणाचा व्हीडिओ व्हायरल होतो आहे. जो १० किलोमीटर धावताना दिसतो. सेनादलात भर्ती होण्यासाठी तो धावण्याचा सराव करतो. नोकरीवरून सुटल्यानंतर तो धावतच घर गाठतो. त्याचा हा व्हीडिओ महिंद्र यांनी पाहिला आणि ते त्याचे चाहते झाले. पण महिंद्र म्हणाले की, त्याला मदत करण्याची गरज नाही कारण तो आत्मनिर्भर आहे.

विनोद कापडी यांनी या मुलाचा व्हीडिओ आपल्या गाडीतून काढला. गाडी चालवत ते त्याच्यासोबत जात होते. तो युवक प्रदीप मेहरा आहे हे त्याने कापडी यांना सांगितले. त्याला गाडीत बसण्यासही कापडी यांनी सांगितले पण त्याने नकार दिला. आपली धावण्याची सवय सुटेल असे म्हणत तो धावत राहिला. त्याला जेवणाबद्दलही कापडी यांनी विचारले तर तो म्हणाला की, मी मॅकडोनाल्डमध्ये काम करतो आणि तिथून सुटल्यानंतर मला घरी जाऊन जेवण करायचे आहे. माझा मोठा भाऊही नोकरीवरून येईल. तेव्हा त्याच्या या बाणेदार उत्तराने कापडी हे प्रभावित झाले. त्याचा हा धावतानाचा व्हीडिओ व्हायरल होईल, असे जेव्हा कापडी यांनी त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला की, होऊ द्या व्हायरल. कारण आपण काही वाईट केलेले नाही.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानच्या अर्थमंत्र्यांना चालवावी लागतेय टॅक्सी

गोव्याची धुरा प्रमोद सावंतांकडे, तर पुष्कर सिंह धामी होणार देवभूमीचे मुख्यमंत्री

हिजाब निर्णयाला विरोध करणाऱ्या विद्यार्थीनींना प्रयोग परीक्षेची संधी नाही

बोईसर पोलिस ठाण्याबाहेर मुस्लिम जमावाचा गोंधळ

 

आनंद महिंद्र त्याच्याबद्दल म्हणतात की, या मुलामुळे मला प्रेरणा मिळाली. पण तुम्हाला ठाऊक आहे का सोमवारसाठी मला काय प्रेरणादायी आहे ते? हा मुलगा स्वावलंबी आहे आणि सदर वाहनचालक त्याला गाडीत बसण्यास सांगत असतानाही तो त्याला तयार नाही. त्याला कुणाचीही मदत नको. तो आत्मनिर्भर आहे!

 

Exit mobile version