आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!

आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!

काही महिन्यांपूर्वी सांगलीच्या दत्तात्रय लोहार यांनी हिरो पॅशन या दुचाकीच्या इंजिनचा वापर करून जिप्सी कार तयार केली होती. या जिप्सीची दखल महिंद्रा आणि महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी घेतली होती. आणि दत्तात्रयला या बदल्यात बोलेरो देण्याचे वचन दिले होते. त्या वचनाप्रमाणे आनंद महिंद्रानी आपले वचन पूर्ण केले असून मिनी जिप्सीच्या बदल्यात नवीकोरी बोलेरो गाडी भेट दिली आहे. गाडी भेट घेताना दत्तात्रय यांच्या पत्नी, आई आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आनंद महिंद्रानी दत्तात्रयच्या कल्पनेचे आणि कौशल्याचे कौतुक करत मिनी जिप्सीच्या बदल्यात नवी बोलेरो गाडी त्याला भेट देण्याचे ट्विटच्या माध्यमातून आश्वासन दिले होते. मात्र दत्तात्रय आपण बनवलेली ही गाडी आपला स्वाभिमान आहे असं म्हणत गाडी देण्यास नकार दिला होता. मात्र त्याचा हा विचार बदलला आणि दत्तात्रय लोहार यांनी स्वतः बनवलेली मिनी जिप्सी महिंद्रा ग्रुपच्या ताब्यात देत नवीकोरी बोलेरो गाडी भेट घेतली.

सह्याद्री मोटर्स सांगली येथे त्यांना गाडी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या दत्तात्रय लोहार यांचे कौशल्य नक्कीच कौतूकास्पद आहे. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रतिकदादा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी गायले राष्ट्रगान

…म्हणून महाराष्ट्रातील चार मुलांना मिळाला राष्ट्रीय बाल पुरस्कार

महाराष्ट्रातील पोलिसांना प्रशंसनीय कार्याबद्दल ५१ पदके

‘ज्याने हिंदुंची मंदिरे तोडली त्या टिपूचा शिवसेना करते आहे गौरव’

 

दत्तात्रय यांनी मुलाच्या हट्टापायी त्यांच्या कल्पकतेने आणि प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ही जिप्सी बनवली होती. आणि तिला ‘ जुगाड जिप्सी ‘ असे नाव दिले होते. त्याने ही जिप्सी बनवायला दुचाकी पॅशन गाडीचं इंजिन, रिक्षाची चाकं, पुढचा भाग हा जीपचा वापरला आहे. तर स्टेअरिंग रॉड त्यांनी स्वत: तयार केला आहे. फॅब्रिकेशनचा त्याचा व्यवसाय आहे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक झाले होते.

Exit mobile version