‘हा भारतीय वंशाचा सीईओ विषाणू आहे; याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही’

‘हा भारतीय वंशाचा सीईओ विषाणू आहे; याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही’

जॅक डोर्सी यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जागी सीईओ म्हणून भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जगभरातून अग्रवाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

स्ट्रीपचे सह- संस्थापक आणि सीईओ पॅट्रिक कोलिसन यांनी ट्विट करत गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोब, आयबीएम, पालो अल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ हे भारतीय वंशाचे आहेत. तंत्रज्ञान जगतात भारतीयांचे हे यश पाहणे खूपच सुंदर आहे, असे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटवर महिंद्रचे प्रमुख आनंद महिंद्र यांनीही अग्रवाल यांना वेगळ्या शैलीत अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा:

न्यायाधीश चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि पोलिसांनाही खडसावले

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

आनंद महिंद्र यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, अशी लाट ही भारतातली आहे याबद्दल आनंद आणि अभिमान आहे. हा भारतीय वंशाचा सीईओ विषाणू आहे. याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, असे आनंद यांनी म्हटले आहे. पॅट्रिक यांच्या ट्विटवर टेस्लाचे एलन मस्क यांनीही ट्विट करत भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला फायदा होत आहे, असे ट्विट केले आहे.

नुकताच आनंद महिंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांची त्यांनी पद्म पुरस्कारांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केले म्हणून प्रशंसा केली होती. पण या पुरस्कारविजेत्यांमध्ये मी स्वतःला पात्र समजत नाही, अशी टिप्पणीही महिंद्र यांनी केली.

Exit mobile version