हा सायकलचालक म्हणजे ‘मानवनियंत्रित स्कूटर’

हा सायकलचालक म्हणजे ‘मानवनियंत्रित स्कूटर’

आनंद महिंद्र यांच्याकडून कौतुक

उद्योगपती आनंद महिंद्र हे समाज माध्यमांवर चांगलेच सक्रीय असतात. अनेक वेगवेगळ्या विषयांवर ते त्यांचे मत व्यक्त करत असतात. नुकातेच त्यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सायकल चालवताना दिसून येत आहे. त्या तरुणाचे आनंद महिंद्र यांनी कौतुक केले आहे.

त्यांनी शेअर केलेल्या तरुणाचा सायकल चालवत असतानाचा व्हिडीओ हा वेगळा आहे. हा तरुण नागमोड्या रस्त्यावर हातांचा वापर न करता सायकल चालवत आहे. या व्यक्तीच्या डोक्यावर कपड्यांचे गाठोडे असून ते धरण्यासाठी त्याचे दोन्ही हात व्यस्त आहेत. तरीही हा तरुण सफाईदारपणे सायकल चालवत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्र म्हणाले की, “हा माणूस मानवनियंत्रित स्कूटर (सेगवे) आहे. त्याच्या शरीरात एक गतिचक्र आहे. अविश्वसनीय असे संतुलन आहे. मात्र, मला कशाचा त्रास होतो, तर आपल्या देशात त्याच्यासारखे अनेक लोक आहेत जे प्रतिभावान जिम्नॅस्ट किंवा खेळाडू असू शकतात. परंतु ते प्रकाशझोतात येत नाहीत किंवा त्यांना प्रशिक्षण मिळत नाही.”

हे ही वाचा:

‘ड्रेनेजचं झाकण ‘त्या’ गायीनेचं बाजूला केलं आणि पडली’

‘शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवा’

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार

‘हिंदू सणांना परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो का?’

या घटनेचा व्हिडीओ तरुणाच्या मागून येणाऱ्या एका वाहनातून शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ प्रफुल्ल नावाच्या व्यक्तीने सोशल मिडीयावर टाकला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटर वापरकर्त्यांनी या तरुण सायकलस्वाराचे कौतुक केले आहे. तर काहींनी आपल्याला बालपण आठवल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version