‘पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद निर्माण करण्यासाठी फिरतंय’

राहुल गांधींचे नाव न घेता गोविंदगिरी महाराजांची टीका

‘पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद निर्माण करण्यासाठी फिरतंय’

राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद निर्माण करण्यासाठी फिरतंय, असे गोविंदगिरी महाराज म्हणालेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एका कार्यक्रमात गोविंदगिरी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.

गोविंदगिरी महाराज म्हणाले, ‘प्रत्येक महत्त्वपूर्ण देशाला नेस्तनाबूत करण्याकरता किती-किती विदेशी शक्ती सगळीकडून गिधाडांसारखं केवळ टपून बसले नाहीतर, लचके तोडण्याकरता पुढे-पुढे घोंगावताय. त्यातील एक घुबड पप्पू नावाचं देशात सगळीकडे हिंडून-हिंडून आणि देशातील संस्कृतीचा नाश करण्याकरता जाती-पातींमध्ये मतभेद निर्माण कऱण्यासाठी प्रयत्न करतोय’, असे म्हणत राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर नाव न घेता सडकून टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले, आमच्या डोक्यात एकच भावना प्रबळ असली पाहिजे ती म्हणजे, ‘ज्यांनी प्रभू श्री रामांना आणले आहे, आम्ही त्यांनाच आणू,’ असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.

हे ही वाचा : 

महाविकास आघाडी नव्हे ही महाअनाडी आघाडी, त्यांना देश, धर्माची चिंता नाही!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला

सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या मुस्लीम व्यापाऱ्याविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या हिंदुंवर पोलिसांचा हल्ला

Exit mobile version