25 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषऑनलाइन फसवणुकीत महिलेचे ८ लाखांचे नुकसान!

ऑनलाइन फसवणुकीत महिलेचे ८ लाखांचे नुकसान!

जोगेश्वरी येथील एका वृद्ध महिलेने तिच्या बँके खात्यातून ७ लाख रुपये गमावले.

Google News Follow

Related

जोगेश्वरी येथील एका वृद्ध महिलेने तिच्या बँके खात्यातून ७ लाख रुपये गमावले. ही घटना तेव्हा घडली जेव्हा एक अनोळखी माणसाने बँक मॅनेजर चे ढोंग रचून तिच्या खात्यातले सगळे पैसे फसवून नेले.

एस.व्ही अनिता (६०) या पीडित महिलेला एका माणसाचा बँक मॅनेजर असल्याचा दावा करणाऱ्या कॉलरवर विश्वास ठेवला. त्या माणसाने अनिता कडे तिचे बँकिंग कार्ड तपशील मागितले. मिळालेल्या तपशील द्वारे त्याने तिच्या तीनही बँक खात्यांची माहिती काढून त्तब्बल ८ लाख रुपये काढून घेतले .

१५ सप्टेंबर रोजी अनिताने ममता करकेरा यांना तिच्या नावावर नवीन विमा पॉलिसी करण्याकरिता २ लाख ५४ हजार रुपयांचा धनादेश घेण्यासाठी बोलावले. एका आठवड्यानंतर, ममताने अनिताला कळवले की चेक वठणार नाही . तक्रारीत, अनिता म्हणाली: “मी ममताला माझा चेक परत करण्यास सांगितले. तिने मला एक संपर्क क्रमांक प्रदान केला जो तिने बँक मॅनेजरशी संबंधित इंटरनेटवर मिळयाचा दावा केला होता. तिने मला चेक मिळविण्यासाठी नंबरवर कॉल करण्याचे प्रयत्न केले . मी प्रयत्न केला पण कोणीही प्रतिसाद दिला नाही”. ३१ ऑक्टोबर चा दरम्यान राकेश शर्मा नावाच्या लबाडने बँक मॅनेजर होण्याच्या दावा करून अनिताला फोन केला. अनायसेने अनिता ने त्या माणसावर विश्वास ठेवला व सगळे कार्ड तपशील त्याला देऊन टाकले.

हे ही वाचा:

मोरबी दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या माजी आमदाराला भाजपाकडून बक्षीस

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

जोगेश्वरीचे पोलिस वरिष्ठ निरीक्षक सतीश तवरे यांनी सांगितले, “सायबर पोलिसांचे पथक तपास करत आहे की कॉलरने अनिताने विमा एजंटला दिलेला चेक कसा पकडला जे ह्या फसवनीचे मूळ कारण ही आहे. तक्रारदाराने कार्डचे तपशील शेअर केल्यानंतर तिने तीन बँक खात्यांमधून पैसे गमावले. तिच्या खात्यांमधून पैसे हस्तांतरित केल्यानंतर ज्या अनेक खात्यांमध्ये पैसे जमा झाले ते खाते आम्ही गोठवायचं प्रयत्न करत आहोत ”. बँकेचे कोणतेही अधिकारी गुंतले होते का किंवा विमा एजंटने चेकचे तपशील शेअर केले होते का, ज्यामुळे फसवणूक झाली याचा तपास पोलीस करत आहेत. बँकेचे कोणतेही अधिकारी गुंतले होते का याचा तपास पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा