पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ललित कला केंद्रातर्फे सादर करण्यात आलेल्या नाटकात राम आणि देवी सीता यांची अपमानास्पद टिंगलटवाळी केल्याप्रकरणी एका प्राध्यापकासह पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. ‘रामलीला’वर आधारित नाटकातील आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांमधून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप प्राध्यापक डॉ. प्रवीण भोळे आणि पाच विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे.
प्रभू श्री राम आणि देवी सीता यांच्या आक्षेपार्ह चित्रणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी आणि ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी जोरदार आक्षेप घेतला. एबीव्हीपी, पुणेने आक्षेपार्ह नाटकाचा व्हिडिओ शेअर केला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विभागाने सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता माता यांना विदूषक म्हणून दाखवण्यात आल्याचे यात म्हटले आहे. एबीव्हीपी कार्यकर्ता हर्षवर्धन हारपुडे यांच्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (ए) अंतर्गत धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा..
मॉर्गन स्टॅनलेकडून पेटीएमच्या २४४ कोटी किमतीच्या समभागांची खरेदी
राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदाराचा संताप
मॉर्गन स्टॅनलेकडून पेटीएमच्या २४४ कोटी किमतीच्या समभागांची खरेदी
शाहजहानच्या वार्षिक उरुसाविरोधात हिंदू संघटनेने घेतली न्यायालयात धाव
अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. प्रवीण भोळे आणि विद्यार्थी भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी आणि यश चिखले यांचा समावेश आहे. एफआयआरनुसार, जेव्हा एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी नाटकावर आक्षेप घेतला आणि प्रदर्शन थांबवले तेव्हा कलाकारांनी कथितपणे त्यांना मारहाण केल्याची नोंद आहे.