वादग्रस्त नाटकप्रकरणी पुणे विद्यापीठाकडून चौकशी समिती

वादग्रस्त नाटकप्रकरणी पुणे विद्यापीठाकडून चौकशी समिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थांनी एका नाटकात प्रभू श्री राम आणि देवी सीता यांच्या संदर्भात असलेला आशय आणि भाषा आक्षेपार्ह असल्याचे दिसून येते. पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कोणीही कायदा हातात घेणार नाही, ही विद्यापीठाची भूमिका आहे. ऐतिहासिक व्यक्तींचे विडंबन करणे चुकीचे आहे, असे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या निष्कर्षांनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ललित कला केंद्राने सादर केलेल्या ‘जब वी मेट’ या नाटकात भगवान राम आणि देवी सीता यांची अपमानास्पद टिंगल उडवल्याबद्दल प्राध्यापक आणि पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. ‘रामलीला’वर आधारित नाटकातील आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांमधून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप प्राध्यापक डॉ.प्रवीण भोळे आणि पाच विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला होता. प्रभू राम आणि देवी सीता यांच्या आक्षेपार्ह चित्रणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी जोरदार आक्षेप घेतला.

हेही वाचा..

बहुपत्नीत्वबंदी, लिव्ह इन रिलेशनशिप जाहीर करावे लागणार!

केरळ: कोझिकोड येथील युवा संमेलनात ‘भारत माता की जय’च्या घोषणेस नकार!

एबीव्हीपीचे हर्षवर्धन हारपुडे यांच्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (ए) अंतर्गत धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. प्रवीण भोळे आणि विद्यार्थी भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी आणि यश चिखले यांचा समावेश आहे. या सहा संशयितांना शनिवारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला.

यावर हारपुडे यांचे वकील शिवम पोतदार यांनी आरोपीचा जामीन फेटाळला जावा, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायाधीशांनी जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे. आरोपींना आठवड्यातून दोनदा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे वकील पोतदार यांनी सांगितले. ‘जब वी मेट’ या नाटकातील प्रभू राम आणि सीतेच्या चित्रणावर आक्षेप घेत पुण्याचे अभाविपचे नेते हर्षवर्धन हरपुडे यांनी शुक्रवारी रात्री चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हारपुडे यांच्यासह अनेक अभाविप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री नाटकाच्या प्रदर्शनात व्यत्यय आणला.

 

Exit mobile version