पाकिस्तानातील बलुच बंडखोरांनी केलेल्या जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरण प्रकरणात एक नवीन कहाणी समोर आली आहे. खरेतर पाकिस्तानी सैन्याने दावा केला आहे कि त्यांनी बलुचिस्तानमध्ये अपहरण केलेल्या ट्रेनमधून सर्व अपहरणकर्त्यांना मुक्त केले आहे. राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) सर्व ३३ बंडखोरांना ठार केले आणि त्यांच्या तावडीतून सर्व ओलिसांची सुटका केली आहे. तर या ऑपरेशन दरम्यान २१ प्रवासी मारले गेले, ज्यामध्ये चार पाक लष्करी जवानांचा समावेश आहे. तथापि, बलुच लिबरेशन आर्मीचा दावा पूर्णपणे वेगळा आहे. बीएलए म्हणते की त्यांच्याकडे अजूनही १५० हून अधिक ओलिस आहेत. याच दरम्यान, एका पंजाबी सैनिकाने मोठे वक्तव्य करत पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश केला आहे.
बलुच लिबरेशन आर्मीचा दावा आहे की, एक्स्प्रेसमध्ये एकूण ४२६ प्रवासी होते, ज्यामध्ये २१४ सेनाचे जवान आणि २१२ सामान्य लोक होते. यानंतर २१२ सामान्य प्रवाश्यांना सोडण्यात आले. बलुच लिबरेशन आर्मीच्या दाव्यानुसार, अपहरण करण्यात आलेले २१४ प्रवासी हे सर्व पाकसेनेचे जवान आहेत. बीएलएने असाही दावा केला कि, यातील ६० लोकांना ठार करण्यात आले आहे. तर उर्वरित १५४ जवान अजूनही ताब्यात आहेत. यामध्ये बीएलएच्या तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, पाकिस्तानी आर्मीने खरच अपहरणकर्त्यांना बीएलएच्या तावडीतून सोडवले कि अजूनही ते त्यांच्या ताब्यात आहेत?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. देशाचे नाव खराब होवू नये यासाठी पाकिस्तान खोटे दावे देखील करत असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान, पंजाबी सैनिकाच्या दाव्याने हा संशय अधिक बळकट झाला आहे.
हे ही वाचा :
बलुची नागरिकांना व्हायचंय पाकिस्तानाच्या जोखडातून मुक्त
डी गुकेशने घेतले तिरुपतीचे दर्शन; केस देवाला अर्पण करत केले मुंडण
स्टॅलिनची सटकली, अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह हटवले
१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या एका प्रत्यक्षदर्शी पंजाबी सैनिकाने म्हटले आहे की त्याने स्वतःच्या डोळ्यांनी बलुच बंडखोरांचा नरसंहार पाहिला. पंजाबी सैनिकाने सांगितले की त्याने स्वतः ५० ते ६० लोकांना मारलेले पाहिले होते, जे बीएलएच्या सदस्यांनी मारले होते. प्रत्यक्षदर्शी पंजाबी सैनिकाच्या या विधानानंतर पाकिस्तानी सैन्याचे खोटे दावे उघडकीस येत आहेत.
An individual who survived the Jaffar Express hijacking told the media that 50 to 60 people were killed by BLA fighters, whom the BLA claimed were serving military personnel. pic.twitter.com/vmVXXSTKhS
— The Bolan News (@TheBolanN) March 13, 2025