मूळ केरळमधील आणि आता कॅलिफोर्नियात असलेल्या एक भारतीय कुटुंबच मृतावस्थेत आढळले आहे. घरामध्ये चार सदस्य होते. १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरात त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. कॅलिफोर्नियातील सॅन माटेओ शहरात ते राहत होते. हि हत्या आहे की आत्महत्या आहे, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आनंद सुजीथ हेन्री (४२), त्यांची पत्नी एलिस प्रियांका बेंझिगर (४०) आणि त्यांची ४ वर्षांची जुळी मुले अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांच्या तपासात त्यांना घराची एक खिडकी उघडी असल्याचे आढळून आले आहे. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना यातील पती आणि पत्नीचे मृतदेह बाथरूममध्ये आढळून आले. विशेष म्हणजे या दोघांच्या अंगावर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा होत्या. याशिवाय घटनास्थळी एक ९ एमएम पिस्तुल आणि लोडेड मॅगझिनही सापडले आहे. त्यांची जुळी मुले एका बेडरूममध्ये सापडली होती आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अंगावर जखमा नसल्यामुळे त्यांची हत्या गळा दाबून करण्यात आली असावी किंवा त्यांना विषबाधा झाली असावी, असे मत तपास यंत्रणांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा..
काँग्रेसने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी २००७ मध्येच फेटाळल्या होत्या!
हल्दवानीमध्ये छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई!
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम
१९६१ नंतर मणिपूरमध्ये स्थायिक झालेल्यांना ‘हद्दपार’ करणार!
दरम्यान यातील आनंद यांनी २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही पूर्ण झालेली नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा कसून तपास तपास यंत्रणा करत आहेत. यातील आनंद आणि ॲलिस हे दोघेही आयटी प्रोफेशनल असून गेल्या नऊ वर्षांपासून ते अमेरिकेत राहत होते. आनंद हा सॉफ्टवेअर अभियंता म्हणून तर ॲलिसने वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करत होते.