लडाखच्या समृद्धीसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय; पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

लडाखच्या समृद्धीसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय; पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती

केंद्र सरकारने लडाखसाठी महत्त्वाचा निर्णय घेत नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. लडाखमध्ये नवे पाच जिल्हे निर्माण करण्याची घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्यापूर्वी लडाख संदर्भात केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

गृह मंत्रालयने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे लडाखमध्ये आता दोन ऐवजी पाच जिल्हे असणार आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी लिहिले आहे की, “विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार गृह मंत्रालयाने केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे असणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट केल्याने तळागाळातील अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्रालयाच्या या महत्त्वाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक गतीमान होणार आहे. लडाखच्या समृद्धीच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे. या भागावर आता अधिक लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना अधिक संधी मिळणार आहे. या भागातील लोकांचे अभिनंदन.

हे ही वाचा :

जम्मू काश्मीर: माजी एसएसपी मोहनलाल भगत यांचा भाजपमध्ये प्रवेश !

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस अडवत ओळख विचारून प्रवाशांवर झाडल्या गोळ्या

युक्रेनचा रशियातील मोठ्या इमारतीवर ड्रोन हल्ला, चार जखमी !

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

भारत सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले होते. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख वेगवेगळे केले होते. सध्या लडाखमध्ये दोन जिल्हे आहेत. लेह आणि कारगिल हे दोन जिल्ह्यांच्या प्रदेशात आता नवीन पाच जिल्हे झाले आहेत. त्यामुळे लडाख सात जिल्ह्यांचा प्रदेश झाला आहे. केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो.

Exit mobile version