बिहारमध्ये एक दरोडेखोर टोळीने चक्क डिझेल आणि व्हिंटेज ट्रेनचे इंजिनचं चोरले आहे. विशेष म्हणजे, त्या टोळीने इंजिनचे वेगवेगळे भाग वेगळे करून इंजिन चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.
गेल्या आठवड्यात एका दरोडेखोर टोळीने बिहारमधील बरौनी येथे गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणलेले संपूर्ण इंजिन चोरले. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीत असलेल्या एका भंगार गोदामातून इंजिनचे भाग जप्त केल आहेत. पोलिसांना तपासात, गरहारा यार्डजवळ एक बोगदा सापडला आहे. ज्यामधून चोर येतात आणि इंजिनचे भाग चोरून पोत्यात भरून घेऊन जातात. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस कसून तपासणी करत आहेत.
या घटनेचा अधिक तपास करताना पोलिसांना आढळून आले की, समस्तीपूर विभागाच्या विभागीय यांत्रिक अभियंत्याने बनावट पत्राच्या आधारे क्लासिक स्टीम इंजिनची विक्री केली होती. तर दुसर्या टोळीने बिहारच्या अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील लोखंडी पूल दिवसाढवळ्या उखडून विकून टाकला होता. पोलिसांनी या दोन्ही घटनेची नोंद केली आहे. पलतानिया पूल हा फोर्ब्सगंज शहराला राणीगंज या अररियामधील दुसरे शहर जोडतो. तेथून काही लोखंडी अँगल आणि पुलाचे इतर महत्त्वाचे भाग गायब झाल्याने पोलिसांना प्रचंड आश्चर्य वाटले आहे.
हे ही वाचा:
परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!
दरम्यान, या वर्षी एप्रिलमध्ये दरोडेखोरांनी सुमारे ५०० टन वजनाचा ४५ वर्षे जुना स्टीलचा पूल दिवसा उखडून विकून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंत्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यांच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी भंगार साहित्य जप्तही केले होते.