मालीवाल यांच्यावरील हल्ला जीवघेणा असू शकतो

बिभव कुमारच्या रिमांड अर्जात दिल्ली पोलिसांचे मत

मालीवाल यांच्यावरील हल्ला जीवघेणा असू शकतो

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर केलेल्या हल्ला प्रकरणात हा हल्ला जीवघेणा असू शकतो, असे दिल्ली पोलिसांनी रिमांड अर्जात म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांनी मालीवाल यांच्यावर हल्ला केला होता. दिल्ली पोलिसांनी आरोपी बिभव कुमारला सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यासाठी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात याचा उल्लेख केला आहे.

पोलिसांनी त्यांच्या रिमांडच्या विनंतीमध्ये असेही नमूद केले आहे की बिभव कुमारने त्याचा मोबाईल फोन फॉरमॅट केल्याचे कबूल केले आहे. त्यातील डेटा मिळवण्यासाठी फोन मुंबईला नेणे आवश्यक आहे. ज्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीची आवश्यकता होती. विशेष म्हणजे, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १३ मे रोजी झालेल्या हल्ल्याच्या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज नसल्याचे दिसून आले आहे.
त्यांच्या रिमांड अर्जात, दिल्ली पोलिसांनी हे देखील अधोरेखित केले की बिभव कुमार यांनी १९ एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव म्हणून त्यांची नियुक्ती रद्द करूनही ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात काम करत होते.

हेही वाचा..

बुटांच्या व्यापाऱ्यांच्या घरात सापडले ४० कोटी!

दादरमधील मॅकडोनाल्डला बॉम्बस्फोटाची धमकी!

दादरमधील मॅकडोनाल्डला बॉम्बस्फोटाची धमकी!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!

यापूर्वी १८ मे रोजी बिभव कुमार यांना अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बिभव कुमारने १३ मे रोजी सीएम केजरीवाल यांच्या निवासस्थानी तिच्यावर पूर्ण ताकतीने हल्ला केला. त्यांच्या पोटात लाथा मारल्या.

Exit mobile version