तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री रचना बॅनर्जी यांनी ९ ऑगस्ट रोजी कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरची ओळख उघड केल्याबद्दल रविवारी माफी मागितली. पीडितेचे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

रचना बॅनर्जी यांनी नुकताच सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करून या घटनेचा निषेध केला आहे. व्हिडिओच्या शेवटी पीडितेचे नाव दिसत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे वकील शायन सचिन बसू यांनी दाखल केलेल्या तक्रारीत तृणमूल खासदाराविरुद्ध त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की बॅनर्जी यांनी “बेपर्वाईने” पीडितेच्या नावाचा अनेक वेळा उल्लेख केला. त्यामुळे पीडीतेच सन्मान धोक्यात आला. दरम्यान, बॅनर्जी यांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. त्यांनी व्हिडिओ डिलीट केल्याचे सांगितले.

हेही वाचा..

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे नागरिकत्व मागणाऱ्यांना न्याय नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार !

एआयएमपीएलबी: सेक्युलर सिव्हिल कोड मुस्लिमांना मान्य नाही!

बांग्लादेशात हिंदूंच्या नोकऱ्यांवर डोळा, घरे-मंदिरावरील हल्ल्यानंतर जबरदस्तीने मागताहेत राजीनामे !

इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की ही माझ्याकडून नक्कीच खूप मोठी चूक होती. मी असे करायला नको होते. व्हिडिओ बनवताना त्या क्षणी मी खूप दुःखी आणि भावूक झाले होते. मी जे शब्द बोलत होते ते सर्व माझ्या मनातून होते. ते स्क्रिप्ट केलेले नव्हते. साहजिकच भावनेने ते नाव माझ्या मनात आले, अये त्या म्हणाल्या.

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी याच गुन्ह्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार लॉकेट चॅटर्जी यांना समन्स बजावले आहे. डॉ कुणाल सरकार आणि डॉ सुबर्णा गोस्वामी या दोन प्रख्यात डॉक्टरांनाही आज संध्याकाळी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७२ मध्ये बलात्कार पीडितांची ओळख उघड करण्यास मनाई आहे आणि त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Exit mobile version