मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न

मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न

मराठी भाषा संवर्धनासाठी  सर्वतोपरी  प्रयत्न होत असून मराठी भाषा विभागांतर्गत संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. मंत्री केसरकर यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा..

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा

अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात,आठ जणांचा मृत्यू!

अतिक अहमदचा सहकारी नफिस बिर्याणी मृत्युमुखी!

रशियाचे व्लादिमिर पुतिन पुन्हा राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत!

मराठी भाषेचा इतिहास जतन करणारे संग्रहालय वाई येथे उभारण्यात येणार आहे. मुंबई येथे मराठी भाषा भवन निर्माण होत आहे. विभागाच्या सर्व मंडळ व संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे, असे मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाचे विविध निर्णय, शिक्षक भरती प्रक्रिया, जिल्हानिहाय बिंदूनामावली, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अभियान आदी विविध बाबींची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

Exit mobile version