मुंबईच्या ८ वर्षीय बालिकेने सर केला माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प

मुंबईच्या गृहिका ने केला सर्वात उंच ट्रेक

मुंबईच्या ८ वर्षीय बालिकेने सर केला माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प

माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठिणातील कठीण ट्रेक मुंबईच्या लेकीने नुकताच २८ ऑक्टोबर २०२२ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा हा ट्रेक मुंबई्च्या गृहिता विचारे हिने नुकताच पार केला. अवघ्या आठ वर्षीय गृहितानं २८ ऑक्टोबर २०२२ रोजी यशस्वीरीत्या हा ट्रेक पूर्ण करून मुंबईत दाखल झाली असता कुटूंबियांसह .मित्रपरिवाराने विमानतळावरच तिचे जंगी स्वागत केले.

माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पची ऊंची ही १७ हजार ५९८ फुट उंचीवर असून चढताना भल्याभल्यांना देखील घाम फुटतो, पण गृहिताला ती एक प्रकारची माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प चढण्याची जिद्दच होती. काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच अशी जिद्द उराशी बाळगून आपल्या पित्यासह तिनं उंच माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्यात यश संपादन केलं. हा ट्रेक तब्बल १३ दिवसांचा असून काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत चार तासांचा आहे. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने आमच्या समोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेलं पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठंही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावं लागलं, अशी प्रतिक्रिया गृहिताचे वडील सचिन विचारे यांनी दिली.

हे ही वाचा :

मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही

किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या करणार तक्रार

गृहिताची मोठी बहिण हरिता सुद्धा ट्रेकचा एक भाग होती पण टिंगबोचे (३ हजार ८६० मीटर) च्या पुढं जाऊ शकली नाही. कारण, तिला जास्तीच्या उंचीमुळे आजाराचा सामना करावा लागला आणि पुढील औषधोपचारांसाठी तिला कमी उंचीवरुन परत खाली यावं लागलं, आता ती पूर्णपणे ठिक आहे. तसेच माऊंट एवरेस्टची चढाई करत खूप जास्त प्रमाणात थंडी व बर्फ अनुभवला त्यासोबतच चढाई करत असताना थंडी लागू म्हणून ५ प्रकारचे जॅकेट तिने थंडी पासून बचाव करण्यासाठी घातले होते. असे गृहिताने सांगितले. गाढव, घोडे, याक सुद्धा तिने पाहिल्याचे सांगितले. गृहिताला ट्रेक करताना दमायला सुद्धा झाले अशी ती गोड तक्रार सुद्धा करते. मात्र गृहिताने मनाशी निर्धार निश्चित करून माऊंट एवरेस्ट बेस कॅम्पची चढाई केली. या नंतर तिचा आत्मविश्वास वाढला असून गृहीता आणखी मोठे ट्रेक करणार असल्याचे सांगते.

Exit mobile version