अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकणाऱ्या तीन बांगलादेशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. इथून पुढे त्यांना विद्यापीठात कधीच प्रवेश मिळणार नाही. या तीन बांगलादेशी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर भारत, मंदिर आणि महिलांविरोधात अश्लील कमेंट केल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यातील तिघांपैकी एका विद्यार्थ्याचे विद्यापीठात शिक्षण सुरु आहे. पण, पदवी पूर्ण केल्यानंतर त्याला पुढील प्रवेश दिला जाणार नाही, असे विद्यापीठाने सांगितले. विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईबाबत विद्यापीठाने बांगलादेशच्या दूतावासालाही याप्रकरणी कळवले आहे.
एएमयू पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी अखिल कौशल आणि इतर काही विद्यार्थ्यांनी प्रॉक्टरकडे अधिकृत तक्रार केली होती. या बांगलादेशींचे शिक्षण बंद करावे, त्यांचा व्हिसा रद्द करावा आणि त्यांना बांगलादेशात परत पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
हे ही वाचा :
मथुरा येथील शिव मंदिरातील मूर्तींची विटंबना; देवी- देवतांच्या फोटोंचीही तोडफोड
अण्णा विद्यापीठ लैंगिक छळ प्रकरण; अन्नामलाई यांनी स्वतःला मारले चाबकाने फटके!
भारताचा मोठा दुश्मन हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू
सरन्यायाधीश कैत यांच्या शासकीय निवासस्थानातून हनुमान मंदिर हटवले?
विद्यार्थ्यांनी प्रॉक्टरकडे तक्रार नोंदवत सांगितले की, तीन बांगलादेशी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर भारतविरोधी आणि हिंदुविरोधी पोस्ट केल्या तर दोन विद्यार्थ्यांनी भारतीय महिलांवर अश्लील कमेंट केल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी इस्कॉन मंदिरांवर बंदी घालण्याची मागणी केली होती आणि इस्कॉनचे वर्णन दहशतवादी संघटना म्हणून केले होते. या विद्यार्थ्यांच्या कमेंटचे स्क्रीनशॉटही विद्यापीठ प्रशासनाला शेअर करण्यात आले. यानंतर एएमयूने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतर विद्यापीठाने तीन बांगलादेशी विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
सॅम्युअल, रिफत रहमान आणि महमूद हसन अराफत अशी या तीन इस्लामिक कट्टरतावादी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या प्रकरणाबाबत प्रॉक्टर वसीम अली म्हणाले की, तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. व्हीएम हॉलमध्ये राहणाऱ्या बीए इकॉनॉमिक्सच्या अंतिम वर्षाच्या रिफत रेहमानला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा अभ्यासक्रम संपल्यानंतर त्याला पुढील प्रवेशापासून बंदी घालण्यात आली आहे.