जिलेबीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांना अमृता फडणवीसांकडून अनोख्या शुभेच्छा

जिलेबीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांना अमृता फडणवीसांकडून अनोख्या शुभेच्छा

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र यांना जिलबी भरवतानाचा फोटो ट्विट करून अनोख्या शैलीत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत, कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! आशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. अमृता फडणवीस यांनी जिलेबीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांचे वाढदिवसानिमित्त केलेल्या कौतुकाची चर्चा होत आहे.

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असून या निमित्ताने त्यांच्यावर देशभरातून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. शिंदे गटातले संजय राठोड, संदीपान भुमरे, दादा भुसे यांनीही सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

जसं प्रभू विना हनुमान अपूर्ण, तसा मी सुद्धा!

जसं प्रभू विना हनुमान अपूर्ण, तसा मी सुद्धा! माझ्या प्रभू श्रीरामांच्या वाढदिवसादिवशी दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो. अशा शब्दात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये प्रसाद लाड यांनी फडणवीसांची तुलना प्रभू श्रीरामांशी तर स्वतःची तुलना हनुमानाशी केली आहे. आमदार प्रसाद लाड यांनी प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची संपूर्णपणे एकाच दगडात कोरलेली मूर्ती भेट केली.

हे ही वाचा:

“शिवसैनिक दूर गेल्यावर आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा सुरू केल्या”

२०२३ मध्ये भारताचे ‘गगनयान’ अंतराळात झेपावणार!

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा २६ जुलैला विस्तार

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

नाथाभाऊंच्या ही शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.फडणवीस व खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. पण तरीही खडसे यांनी खुल्या मनाने दिलेल्या शुभेच्छांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Exit mobile version