समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार मेहबूब अली यांनी उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या वाढीबाबत वक्तव्य करून भाजप सरकारला इशारा दिला आहे. ‘उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिमांची संख्या वाढत आहे, त्यामुळे भाजपची सत्ता जाणार आहे’, असे सपा आमदार मेहबूब अली यांनी म्हटले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे मेहबूब अली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपा आमदार आणि पूर्व मंत्री मेहबूब अली रविवारी (२९ सप्टेंबर) रोजी बिजनौरमध्ये संविधान सन्मान सभेच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातून भाजपची सरकार आता जाणार आहे, कारण प्रदेशात मुस्लिमांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता भाजपची जाण्याची वेळ आली आहे. २०२७ मध्ये आमच्या येण्याची वेळ आली असून भाजपची जाण्याची वेळ आली आहे. आता हे नक्की आहे की, भाजपा सत्तेमध्ये येणार नाही. ते पुढे म्हणाले, जे काम मुघलांनी ८५० वर्षे देशावर राज्य करून केले नाही, ते काम हे काय करणार आहेत, असे सपा आमदार मेहबूब अली म्हणाले.
हे ही वाचा :
चेन्नईत मशिदीबाहेर हसन नसराल्लाहचे बॅनर
किमान देवांना राजकारणापासून दूर ठेवा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर इडीकडून गुन्ह्याची शक्यता
राज्यात गायी राज्यामाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान
मेहबूब अली यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणी सपा आमदाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबूब अली तसेच शेख झाकीर हुसेन आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे आमदार शलभमणी त्रिपाठी यांनीही या विधानावर भाष्य केले. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, सपा आमदार मेहबूब अली यांचा हिंदूंवर उघड संताप, “मुस्लिम लोकसंख्या वाढली, आता तुमची राजवट संपेल, २०२७ मध्ये तुम्ही जाल, आम्ही सत्तेत येऊ, असे शलभमणी त्रिपाठी यांनी लिहिले.
हिंदुओं को सपा विधायक महबूब अली की खुली भभकी
“मुस्लिम आबादी बढ़ गई,अब तुम्हारा राज खत्म हो जाएगा,2027 में तुम जाओगे, सत्ता में हम आएँगे” pic.twitter.com/BlUmnaC4Dz
— Dr. Shalabh Mani Tripathi (@shalabhmani) September 30, 2024