अमरावतीमध्ये सकल हिंदू समाजाकडून विराट मोर्चा काढण्यात आला आहे. बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदुंवरील अत्याचारा विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या.
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून पेटलेला वाद अजूनही मिटलेला नाही. हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देवून देश सोडला, त्यानंतर देशात अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, हिंसाचाराच्या घटना अजूनही काही ठिकाणी सुरूच आहेत. यामध्ये हिंदुंना सर्वात जास्त टार्गेट करण्यात आले. जिहादी जमावाने हिंदुंना लक्ष्य करून हिंदूंची मंदिरे, घरे, चोरी आणि हिंदूंची हत्या केली. अजूनही अशा अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यावरून भारतासह जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधात हिंदू समाजाकडून देशभरात मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यभरातही असे मोर्चे निघत आहेत.
हे ही वाचा :
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आरक्षणविरोधी
इस्रायल, हिजाबुल्ला आमनेसामने; एकमेकांवर डागली रॉकेट्स
महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावरील हिंदुत्ववाद्याची व्यथा!
‘किसान एक्सप्रेस’चे डबे झाले वेगळे; ८ डबे रेल्वेस्थानकावर तर १३ डबे रुळावर !
अमरावतीतही आज असाच मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समजाच्या वतीने हा विराट मोर्चा काढण्यात आला. अमरावतीच्या नेहरू मैदानापासून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात विविध हिंदुत्व संघटनांचा समावेश होता. हातात फलक घेवून महिलांनीही मोठ्या प्रमाणात या मोर्चेत सहभागी झाल्या होत्या.