अमोल मिटकरी हे औरंगजेबाच्या कुटुंबातले!

भाजपा आमदार टी राजा सिंह यांची टीका 

अमोल मिटकरी हे औरंगजेबाच्या कुटुंबातले!

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंगल खोरांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तेलंगनाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह यांच्यावर टीका केली होती. मिटकरी यांच्या टीकेला भाजपा आमदाराने प्रत्युतर देत अमोल मिटकरी हे औरंगजेबाच्या कुटुंबातील असल्याचे आमदार टी राजा सिंह यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी नगरमधील औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे असे टी राजा सिंह बोलत आहेत, असा प्रश्न अमोल मिटकरी यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, टी. राजा यांचे वक्तव्य कोणीही गांभीर्याने घेत नाही, ते भडकाऊ भाषण देण्यात माहीर आहेत. अशी भडकाऊ वक्तव्य करून ते महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले, जर खरच त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आपल्या मुलाला घेवून यावे आणि औरंगजेबाच्या कबरीवर जावे.

हे ही वाचा : 

आयपीएल २०२५ : राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग करणार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले; दोन वेगळ्या चकमकींमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा

चॅम्पियन्स रोहित सेना मालामाल!

आदर्श बंधु संघाचा ‘फाग महोत्सव २०२५’ दणक्यात साजरा

यावर टी राजा उत्तर देत म्हणाले, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतून औरंगजेबाची कबर हटली पाहिजे, त्याप्रमाणे संपूर्ण भारतात एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा आमदार अमोल मिटकरी माझ्यावर टिप्पणी करतो कि राजा सिंह यांची पुढील पिढी परदेशात शिक्षण घेईल.

ते पुढे म्हणाले, अमोल मिटकरी तुमच्यात हिम्मत असले तर तुम्ही तुमच्या मुलासह हातात फावडा घेवून औरंगजेबाची कबर फोडण्यासाठी या. ते पुढे म्हणाले, औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करण्यासाठी मी आणि माझा मुलगादेखील येऊ . भारताचा प्रत्येक पुत्र यासाठी येईल. औरंगजेबाच्या बाजूने समर्थन करणारा जो समाज आहे, त्यातले अमोल मिटकरी तुम्ही आहात. मला असे वाटते कि तुम्ही औरंगजेबाच्या कुटुंबातील आहात, असे टी. राजा सिंह म्हणाले.

 

सावध...बांगलादेशी घरापर्यंत पोहोचलेत ! |Mahesh Vichare | Bangladeshi Immigrants | Atul Bhatkhalkar

Exit mobile version