‘बिग बी’ने कोरोनाला दुसऱ्यांदा लगावला ठोसा

अमिताभ यांनी चाहत्यांचे आभार मानणारे ट्विट केले

‘बिग बी’ने कोरोनाला दुसऱ्यांदा लगावला ठोसा

मेगास्टार अमिताभ बच्चन काेराेनावर मात करून पुन्हा एकदा कामावर परतले आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’चा १४वा सीझन होस्ट करत आहेत. शोच्या मध्यभागी जेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले तेव्हा त्याने स्वतःला क्वारंटाइन केलं हाेतं अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आले. पण यावेळीही अमिताभ यांनी कोरोनाला हरवलं आणि शोचे शूटिंग सुरू केलं आहे.

बॅक टू वर्क.. तुमच्या प्रार्थना… काल रात्री निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे आणि ९ दिवसांचा आयसाेलेशन संपला आहे. ७ दिवस अनिवार्य आहे.. सर्वांना माझे प्रेम…तुमचा दयाळूपणा आणि सतत काळजी…कुटुंबाची काळजी..माझे दोन्ही हात तुमच्यासाठी जोडलेले आहेत. असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी साेशल मीडियावर आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आयसोलेशन दरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले हाेते की, मी माझे काम मिस करत आहे. अमिताभ यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘जेव्हा काम करायचो तेव्हा विचार करायचो की सुट्टी कधी मिळेल, सुट्टी मिळाली की काम कधी मिळेल.’ असा विचार येताे असे बिग बींनी आयसाेलेशनच्या दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली हाेती. २३ ऑगस्ट राेजी साेशल मिडियावर त्यांनी आपल्याला काेराेना झाला असल्याचे सांगितले हाेते. तेव्हापासून चाहते अमिताभ बच्चन लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते.

हे ही वाचा:

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

अमिताभ यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी ऐकून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी २०२० मध्ये देखील अमिताभ बच्चन कोरोनाच्या विळख्यात आले होते. त्यावेळी बच्चन कुटुंबातील अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि नात आराध्या यांनाही संसर्ग झाला होता. लवकरच ते ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया पहिल्यांदाच दिसणार आहेतविकास बहलच्या “गुडबाय”, “उच्छाई” आणि “प्रोजेक्ट के” मध्ये दिसणार आहे.

Exit mobile version