बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अभिताभ बच्चन यांना रामाची नगरी अयोध्येत एक आलिशान घर बांधायचे आहे.त्यासाठी अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या ७-स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये एक भूखंड खरेदी केला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन हे अंदाजे १०,००० स्क्वेअर फुटांचे घर बांधणार आहेत आणि त्याची किंमत १४.५ कोटी रुपये आहे.
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिर अभिषेक सोहळा पार पडणार आहे.त्याच दिवशी सरयू एन्क्लेव्हचे लोकार्पण होणार आहे.प्रोजेक्ट शरयू हा ५१ एकरात पसरलेला आहे.या प्रकल्पातील आपल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, अयोध्येचं माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. ते पुढे म्हणाले की, अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता एकत्र राहतात.मी या ग्लोबल स्पिरिच्युयल कॅपिटलमध्ये माझे घर बनवण्यास उत्सुक आहे.
हे ही वाचा..
दिल्लीत धुक्यामुळे १० विमाने दुसरीकडे वळवली, २० उड्डाणे रद्द, ४०० विमानांना उशीर!
टिकली, लिपस्टिक अन् हातकड्या… परीक्षेत मुलगी असल्याचे भासवणाऱ्या पंजाबमधील मुलाला अटक!
शशी थरूर यांचे भाकीत… ‘भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल’
मुंबई- काळाचौकी परिसरातील पालिकेच्या शाळेत सिलेंडर्सचा स्फोट!
एचओएबीएलचे अध्यक्ष अभिनंदन लोढा यांनी कंपनीसाठी हा मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे.अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन लोढा यांच्या ७-स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये एक भूखंड खरेदी केल्यानंतर लोढा म्हणाले की, की शरयूचे “प्रथम नागरिक” म्हणून आम्ही बच्चन यांचे स्वागत करतो. हा प्रकल्प राम मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. या एन्क्लेव्हमध्ये ब्रुकफील्ड ग्रुपचे लीला पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या भागीदारीत एक पंचतारांकित पॅलेस हॉटेल देखील असेल. हा प्रकल्प मार्च २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बनणार असल्याने या भागातील जमिनीच्या किमती वाढल्या आहेत.टाटा समूहाशिवाय इतर मोठे समूहही अयोध्येत गुंतवणूक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतच रिअल इस्टेटच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.