31 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेष...म्हणून अमिताभ बच्चन यांनी लावला रोहित शर्माला व्हिडिओ कॉल

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी लावला रोहित शर्माला व्हिडिओ कॉल

Google News Follow

Related

क्रिकेट आणि बॉलिवुड यांचा संबंध काही नवा नाही. भारतात क्रिकेट आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी प्रचंड लोकप्रिय आहेत. अनेकदा एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टी मध्ये आपल्याला बॉलिवूडचे अभिनेते-अभिनेत्री आणि क्रिकेटपटू एकत्र पाहायला मिळतात. पण असे काही नसतानाही बॉलीवुड आणि क्रिकेट एकत्र आलेले पाहायला मिळाले आहे. ज्यामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा याला व्हिडिओ कॉल लावला.

अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय खेळाचे यजमानपद भूषवत आहेत. तर रोहित शर्मा हा दुबईमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आयपीएल खेळत आहे. कौन बनेगा करोडपातीच्या सेटवरूनच बिग बी यांनी रोहित शर्माला व्हिडिओ कॉल केला.

हे ही वाचा:

देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार

‘केंद्र सरकारने जे केले ते कोणताही देश करू शकत नाही’

४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट

भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित

केबीसी मध्ये प्रांशू त्रिपाठी नावाचा एक स्पर्धक सहभागी झाले आहेत. पेशाने शिक्षक असणारे प्रांशू हे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. रोहित शर्मा हा त्यांचा सर्वात आवडता खेळाडू. प्रांशू त्रिपाठी यांच्या पाकिटात त्यांच्या प्रेयसीचा फोटो नसतो पण रोहित शर्माचा फोटो ते ठेवतात. गप्पांच्या ओघात अमिताभ बच्चन यांना ही गोष्ट समजली. तेव्हा त्यांनी प्रांशु त्रिपाठी यांना एक गोड सरप्राईज देण्याचे ठरवले.

त्यांनी थेट कार्यक्रमातून रोहित शर्मा याला व्हिडिओ कॉल लावला. प्रांशु यांना कल्पनाच नव्हती की अमिताभ यांनी नेमका कोणाला फोन लावला आहे. पण समोर स्क्रिनवर जेव्हा त्यांना रोहित शर्मा दिसला तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आज आपण देव पहिल्याचे म्हणत त्यांनी रोहित शर्माला अभिवादन केले. तर रोहित शर्मा याने प्रांशु यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा