मागाठाणेतून अमित ठाकरेंना मैदनात उतरवण्यासाठी मनविसेने कंबर कसली

विधानसभा क्षेत्रात झळकली पोस्टर्स

मागाठाणेतून अमित ठाकरेंना मैदनात उतरवण्यासाठी मनविसेने कंबर कसली

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मुंबईतही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असताना आता उपनगरातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी पोस्टर्स लागल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. मुंबईतही अनेक मतदारसंघाची राज ठाकरे यांनी चाचपणी केली आहे. सध्या उपनगरात मनसेची ताकतही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मागाठाणे विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने मनसेने प्रयत्न सुरु केले आहेत.

हेही वाचा..

मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

‘एक देश, एक निवडणूक’ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नल!

रशियाच्या संकटातून सुखरूप परतला जम्मू-काश्मीरचा आजाद, पंतप्रधानांचे मानले आभार!

डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!

या पार्श्वभूमीवर उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, त्यांच्या विजयासाठी मागाठणे विधानसभा सज्ज आहे. केवळ राज ठाकरे यांच्या आदेशाची गरज आहे, असा मजकूर असलेले पोस्टर्स ठिकठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष मिलिंद घाग यांनी हे पोस्टर्स विधानसभा क्षेत्रात लावले आहेत. यापूर्वी सुद्धा अमित ठाकरे यांनी मुंबईतील भांडूप, माहीम विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

आता मागाठाणे विधानसभेतून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या मागाठाणे विधानसभेतून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे विद्यमान आमदार आहेत. अमित ठाकरे यांनी या विधानसभेतून निवडणूक लढवावी, अशी मागणी झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय निर्णय घेणार ? याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version