केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनल रमणभाई पटेल यांच्यावर तब्बल ७ लाखापेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे.
गुजरातमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ५.५७ लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते.
हेही वाचा..
मंडीच्या गादीवर ‘क्विन’च! कंगना रनौतकडून काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा परभव
नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विजयी, ठाकरेंच्या वैशाली दरेकरांचं खातं बुडीत!
एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या गांधीनगर मतदारसंघातून खासदार म्हणून केंद्रीय गृहमंत्री यांची ही दुसरी टर्म असेल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये ही जागा जिंकली होती. मात्र त्यांनी लखनौची जागा (उत्तर प्रदेशातील) राखणे पसंत केले होते.
गुजरातमधील लोकसभेच्या २५ पैकी २४ जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे आणि एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.