नरेंद्र मोदी भारताला स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी ठेवत असताना इंडी आघाडीच्या सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रमुखपदे भूषवायची आहेत. नरेंद्र मोदी यांचे ध्येय आत्मनिर्भर भारत आहे. तर इंडी आघाडीचे उद्दिष्ट काय आहे तर आपापल्या घरच्यांना प्रमुख पदावर बसवायचे आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. रविवारी नवी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर हल्ला चढवला.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, सोनिया गांधींचे लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान करणे, शरद पवार यांचे उद्दिष्ट आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवणे, ममता बॅनर्जींचे उद्दिष्ट आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री करणे, एमके स्टॅलिन यांचे लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे, लालू प्रसाद यादव यांचे उद्दिष्ट आहे आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचे आहे, उद्धव ठाकरेंचे आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या लोकांना आपल्या कुटुंबासाठी सत्ता बळकावायची आहे ते कधी गरिबांच्या कल्याणाचा विचार करतील का? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे राम मंदिर अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा..
हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर
कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…
अमरावतीत टेम्पो ट्रॅव्हल अपघातात चार क्रिकेटपटूंचा मृत्यू!
कोटामध्ये १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता
गृहमंत्री शाह म्हणाले, देशातील लोकशाहीला भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण आणि जातीयवादाचा रंग दिला. पंतप्रधान मोदींनी १० वर्षात भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण संपवून विकास साधला. गेल्या १० वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने बदल घडवून आणला आहे. कॉंग्रेस आणि इंडी आघाडीने दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना आपली व्होट बँक म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्यांदाच या समाजांना भाजप सरकारने त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. देशात दहशतवाद आणि नक्षलवाद संपुष्टात आला असून मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देश त्यापासून मुक्त होईल, अशी ग्वाहीही अमित शहा यांनी दिली.