तौक्ते चक्रीवादळाचा गोव्याला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे गोव्याची दाणादाण उडाली असून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रालाही या वादळाचा धोका असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू केली आहे.
तौक्त चक्रीवादळ अक्राळविक्राळ रुप धारण करत आहे. महाराष्ट्रातील काही भागांना या वादळाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू आहे. या बैठकीत शहा राज्यातील तयारीचा आढावा घेत आहेत. तर आज दुपारी १२ वाजता भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या शहरातील भाजपाचे खासदार, आमदार आणि पक्षनेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यात नुकसानीचा आढावा घेऊन मदत कार्याची चर्चा करणार आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तटवर्तीय परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील जिल्हाधिकारी आणि आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कर्नाटकालाही या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या २४ तासात तटवर्तीय ६ जिल्ह्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात चक्रीवादळामुळे चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या वादळाचा ७३ गावांना फटका बसला आहे. कर्नाटकातील ६ जिले, ३ तटवर्तीय जिल्हे आणि ३ मलनाड जिल्ह्यात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस झाला आहे.
हे ही वाचा:
मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना
मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन
…आणि केंद्राच्या मदतीमुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लँटला मिळाला स्पेअरपार्ट!
ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांच्या गठड्या वळल्या
गोव्यातही चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पणजीमध्ये चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पाहायला मिळाला आहे. चक्रीवादळामुळे गोव्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. एका कारवर झाड पडल्याने ही कार चक्काचूर झाली आहे. अजूनही गोव्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.