शिवजयंतीचे औचित्य साधून पुण्यातील आंबेगाव नऱ्हे येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केवळ छत्रपतींना आदर्शच मानतात असं नाही, तर छत्रपतींच्या जीवनावर सातत्याने त्यांनी संशोधन केलं आहे आणि मराठा साम्राजाच्या संदर्भात वेगवेगळे दस्ताऐवज प्राप्त करून, महाराजांपासून ते वसईच्या संधी पर्यंत ज्या काही घटना आहेत, त्या घटना लेखणीबद्ध करून ते स्वत: यावर एक पुस्तक लिहित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी साकारत आहे. शिवजयंतीच्या दिवशी अमित शाह यांनी शिवसृष्टीच्या कामाची पाहणी केली. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारने शिवसृष्टीला ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले की , “आज शिवजंयती आहे आणि हाही योगायोग आहे की काल शिवरात्र होती. जे शिवतत्व खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला तेज देतं. त्या तेजाचं प्रतिक असलेले, छत्रपती शिवराय यांच्या जयंतीच्या निमित्त आपण सर्व लोक त्यांना नमन करूया. आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, की या पवित्र दिवशी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातून होत आहे, हेदेखील अत्यंत महत्त्वाचं आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले
भूकंपाच्या आघातानंतर आता सीरियावर हवाई हल्ला
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप
१९९०मध्ये त्याने चोरी केली होती, आता सापडला!
खरे शिवप्रेमी असलेले अमित शाह यांनी महाराजांची स्वधर्म, स्वभाषा आपल्या संस्कृतीचा या ठिकाणी पुरस्कार करणं ही संकल्पना खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात साकारलेली आहे. आज गृहमंत्री म्हणूनदेखील पुन्हा एकदा काश्मीरपासून ते पूर्वोत्तर पर्यंत सगळीकडे महाराजांचाच आशीर्वाद घेऊन, त्यांचच तेज घेऊन या ठिकाणी काम करत आहेत. म्हणून मला असं वाटतं की अतिशय योग्य व्यक्तीच्या हातून आज आपण, या शिवसृष्टीचं उद्घाटन करतो आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपलया भाषणात अमित शाह यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले की आज अमित शाह इथे आहेत. अनेक लोकांना माहीत नसेल मात्र ते शिवप्रेमी आहेत. त्यांना मराठ्यांचा आणि शिवरायांचा दांडगा अभ्यास आहे. असे सांगत यावर ते एक पुस्तक लिहित आहे. लवकरच ते प्रकाशित होईल. शिवसृष्टीला काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.