27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसंसदेतील सुरक्षाभंगावरून विरोधी पक्षांचे राजकारण!

संसदेतील सुरक्षाभंगावरून विरोधी पक्षांचे राजकारण!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

Google News Follow

Related

संसदेतील सुरक्षा भेदून घुसखोरी झाल्याप्रकरणी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले होते. मात्र विरोधी पक्ष या प्रकरणावरून राजकारण करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्षांचा समाचार घेतला.

‘ही अतिशय गंभीर घटना आहे. यावरून विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. अर्थात, सुरक्षेत त्रुटी आहेत. मात्र सर्वांनाच माहीत आहे की, संसदेची सुरक्षा ही लोकसभाध्यक्षांच्या अखत्यारितील बाब आहे आणि याबाबत लोकसभाध्यक्षांनीही केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून कळवले आहे. आम्ही या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली असून लवकरच त्याचा अहवाल लोकसभाध्यक्षांना पाठवला जाईल,’ असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. ‘संसदेची सुरक्षा कशी भेदण्यात आली, याचा तपास ही समिती करेल, तसेच, लोकसभा सुरक्षा आणखी कडक करण्यासाठी काय उपाय करता येतील, याबाबतही समिती मार्गदर्शन करेल,’ असे शहा म्हणाले.

हे ही वाचा:

अबब! स्विगीकडून त्याने वर्षभरात मागवले ४२ लाखांचे पदार्थ!

ठाण्यातील तरुण अडकला होता हनीट्रॅपमध्ये, पाक तरुणींच्या आला होता संपर्कात

४७ वर्षांचा अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका

गडचिरोलीत सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार!

‘सुरक्षाव्यवस्थेत कोणत्याही प्रकारची त्रुटी असता कामा नये, आणि काही त्रुटी असल्याच तर त्या दूर करणे ही आपली जबाबदारी आहे. या प्रश्नाला राजकीय मुद्दा बनवू नये,’ असे आवाहन शहा यांनी केले.सन २००१मधील संसदेवरील हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशीच दोघा जणांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. त्यानंतर या घुसखोरांनी निळ्या रंगाचा धूर सोडून घोषणाबाजी केली होती. या दोघांना खासदारांनी जेरबंद करून चोप दिला. दुसऱ्या दिवशी, गुरुवारीही या घटनेचे पडसाद संसदेत पाहायला मिळाले.

विरोधी पक्षांच्या खासदारांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केल्यामुळे संसदेत गोंधळाचे वातावरण होते. अमित शहा यांनी या प्रकरणी निवेदन सादर करावे, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. संसदेत अयोग्य वर्तन केल्यामुळे विरोधी पक्षांच्या १४ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यातील १३ खासदार लोकसभेचे असून एक खासदार राज्यसभेचा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा