केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याची भूमिका हाती घेतल्यानंतर नक्षलीहल्ल्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत अनेक माओवादी ठार झाले आहेत, अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करत आहेत. याच दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येणाऱ्या पुढील एक-दीड वर्षात नक्षलवाद्यांचा नायनाट केला जाईल, माओवाद्यांनी हिंसाचार सोडून, शस्त्रे टाकावी आणि आत्मसमर्पण करावे, असे आवाहन गृहमंत्री शाह यांनी केले आहे. नक्षली हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनी दिल्लीमध्ये आज (२० सप्टेंबर) गृहमंत्री शाह यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार गृहमंत्री शाह म्हणाले, आम्ही या देशातून नक्षलवाद आणि नक्षलवादाची कल्पना समूळ उखडून टाकू आणि शांतता प्रस्थापित करू. नरेंद्र मोदी सरकार देशातील नक्षलवाद संपवण्यात यशस्वी ठरले आहे. बस्तरचे ४ जिल्हे वगळता संपूर्ण देशाने, नक्षलवादाला या देशातून अंतिम निरोप देण्यासाठी ३१.०३.२०२६ ही तारीख निश्चित केली आहे. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करत त्यांचे अनेक मनसुबे हाणून पाडले आहेत.
हे ही वाचा :
आता दंगल केलीत तर भरून द्या! उत्तराखंडमध्ये कायदा
महागाई कुठे आहे? आयफोन खरेदीसाठी लागल्या रांगा
वन नेशन वन इलेक्शन मोदी सरकारला नो टेन्शन!
कमाल आहे, कोल्हेना महारावांचे भाषणच माहीत नाही म्हणे !
ते पुढे म्हणाले, माओवाद्यांनी एकदा पशुपतीनाथ (नेपाळ) ते तिरुपती (आंध्र प्रदेश) पर्यंत कॉरिडॉर बनवण्याची योजना आखली होती, परंतु मोदी सरकारने ती उद्ध्वस्त करून टाकली. ते पुढे म्हणाले, छत्तीसगडमधील नक्षलवादी हिंसाचारग्रस्त लोकांसाठी राज्य सरकारच्या समन्वयाने गृह मंत्रालय लवकरच कल्याणकारी योजना तयार करेल. नोकऱ्या, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मदत करेल, असे गृहमंत्री शाह म्हणाले.