केंद्रिय गृहमंत्री अमित शाह हे आज छत्तिसगढमध्ये काल नक्षलवाद्यांचा सामना करताना हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्तिसगढ मध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर ते याबाबत राज्य सरकारच्या पोलिस प्रशासनासोबत बैठक घेणार आहेत.
काल बिजापूरच्या जंगलात जवानांची आणि नक्षवलाद्यांची चकमक झडली होती. त्यामध्ये किमान २२ जवान हुतात्मा झाले होते. यात काही नक्षलवादी देखील मारले गेले, परंतु त्यांची नेमकी संख्या कळू शकली नाही.
हे ही वाचा:
सामान्य जनतेसाठी लॉकडाऊन, मंत्री मात्र विनामास्क प्रचारात
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
नितीन गडकरींकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा
या निर्घृण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आसाममधील प्रचार सोडून पुन्हा दिल्लीला आले. याशिवाय त्यांनी सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल कुलदीप सिंग यांना छत्तीसगडला तातडीने जायला सांगितले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील आसामचा प्रचार थांबवत छत्तीसगडला परतले होते.
आज या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमित शाह जातीने छत्तिसगढमध्ये उपस्थित राहिले. त्यानंतर ते ज्या ठिकाणी ही चकमक झाली त्या सुकमा येथे देखील जाणार आहेत. अमित शाह यांनी या जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही असे सांगितले होते. आजच राज्यातील विविध वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा बलाचे विविध अधिकारी यांची बैठक होणार आहे.
शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे (सीआरपीएफ) कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं. या नक्षलवादी विरोधी अभियानात जवळपास दोन हजार जवान सामील होते. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती.