गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंब्रा पोर्ट येथे तब्बल दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. गुजरातमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज कसे काय सापडते यावरून विरोधकांनी गुजरात सरकारवर हल्ला चढवला. याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये सडेतोड उत्तर दिलं आहे.
संसदेमध्ये गुजरातमधील ड्रग्स सापडण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या प्रश्नांना संसदेत उत्तर देताना अमित शहा म्हणाले, जर कुठल्या राज्यात सर्वाधिक ड्रग्ज सापडले असेल तर त्या राज्याने आणि त्या राज्यातील तपास यंत्रणांनी ड्रग्ज तस्करांविरोधात चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक गुन्हेगारी उघड करण्यासाठी अनेक उत्तम दर्जाचे विश्लेषक आम्ही नेमले आहेत. त्यांच्या विश्लेषणामुळे अनेक मोठ्या घटना देशात उघडकीस आल्या आहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात जे ड्रग्ज सापडले, ते या नव्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे, असे अमित शहा म्हणाले आहेत.
यावेळी अमित शहा यांनी शेरोशायरीसुद्धा केली आहे. ते म्हणाले, मिट्टी में मुंह डालने से आंधी नहीं चली जाती, आंधी का सामना करना पड़ता है, सीने पर झेलना पड़ता है…’ शुतुरमुर्ग नीतिपासून आपण देशाला वाचवू शकत नाही, असे म्हणत अमित शहा यांनी विरोधकांनावर टीका केली आहे.
हे ही वाचा :
ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामीनदाराचं शिंदे गटात
लोकायु्क्त कायद्याचे शस्त्र विरोधकांना पेलवेल काय?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोर्टवर तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने देशात खळबळ उडाली होती.