माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करून चूक केली होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राजस्थानमधील जोधपूर येथील निवडणूक प्रचारसभेत सांगितले. तसेच, ३७० कलम हटवून हा कायदा संपुष्टात आणल्याबद्दल आणि काश्मीरमध्ये भारताचा ध्वज उभारल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
‘भाजपच्या स्थापनेपासून आम्ही दिलेली सर्व आश्वासने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करून एक चूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० संपुष्टात आणले आणि काश्मीरमध्ये भारतीय ध्वज फडकवला,’ असे त्यांनी सांगितले.
अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीसाठी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. काँग्रेसने अनेक दशकांपासून राम मंदिराच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘७० वर्षांपासून काँग्रेस पक्ष ‘रामजन्मभूमी’ येथील राम मंदिराच्या मुद्द्यापासून दूर गेला आहे, परंतु पंतप्रधान मोदींनी केवळ रामजन्मभूमीची पायाभरणीच केली नाही, तर २२ जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठाही केली, ‘ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
अल जझीराला ‘दहशतवादी वाहिनी’ म्हणत इस्रायलमध्ये प्रक्षेपणावर बंदी
सीरियामध्ये इराणी दूतावासाजवळ इस्रायलचा हवाई हल्ला
ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!
छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पाच वर्षांत प्रथमच भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन माजी पंतप्रधान नेहरूंवर टीका केली होती. ‘नेहरूंसाठी कच्चाथिवू बेट बिलकूल महत्त्वाचे नव्हते. या बेटावरील भारतीय हक्क सोडण्यास त्यांचा आक्षेप नव्हता. इंदिरा गांधींचेही तेच मत होते, अशा रीतीने आपण हे बेट गमावले,’ असे जयशंकर म्हणाले. या वक्तव्यानंतर अमित शहा यांचे हे विधान आले आहे.
अमित शहा यांनी गेल्या वर्षी लोकसभेत नेहरूंनी संपूर्ण काश्मीर जिंकल्याशिवाय युद्धविराम जाहीर करणे (१९४८ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान) आणि पाकिस्तान सोबतचा वाद संयुक्त राष्ट्रात घेऊन जाणे या दोन गंभीर चुका केल्या, असे म्हटले होते.