मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर अमित शहांचा प्रहार !

विकसित भारत पाह्ण्यासाठी खर्गेना दीर्घायुष्य लाभो अशी केली प्रार्थना

मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर अमित शहांचा प्रहार !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या “पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही” या वक्तव्याला लज्जास्पद म्हटले आहे. ८३ वर्षीय खर्गे यांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील रॅलीत ही टीका केली होती. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना त्यांच्या भाषणावेळी त्रास झाला. काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी अशी टिपण्णी केली होती.

एका ट्विटमध्ये शाह यांनी आरोप केला आहे की खर्गे यांच्या टिप्पण्यांमधून पंतप्रधान मोदींबद्दल असलेला द्वेष आणि भीती काँग्रेस नेते सतत प्रतिबिंबित करतात. त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीमध्ये ओढण्याची काही गरज नव्हती, असेही ते म्हणाले.

हेही वाचा..

जम्मू- काश्मीरमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या २३ सरकारी अधिकाऱ्यांचे निलंबन

हरियाणा काँग्रेसकडून आणखी १० नेत्यांची हकालपट्टी

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’

सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली

रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात तिरस्कार दाखवून दिला. त्यांनी विनाकारण पंतप्रधान मोदींना त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत ओढले. पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवल्यानंतरच आपला मृत्यू होईल, असे ते म्हणाले होते. या काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल किती द्वेष आणि भीती आहे, ते सतत याचाच विचार करत असतात, हेच या खर्गे यांच्या विधानावरून दिसून येते.

खर्गे यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रर्थाना केली. त्यांची प्रकृती उत्तम राहो, त्यांना दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. ते असेच अनेक वर्षे राहिले पाहिजेत. विकसित भारताची निर्मिती पाहण्यासाठी ते असणे आवश्यक आहेत असे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे.

सीतारमण यांनी शहा यांचे ट्विट शेअर करत म्हटले आहे की, अमित शाहजी, बरोबर सांगितले. नरेंद्र मोदींबद्दल द्वेष दाखवण्याची एकही संधी काँग्रेसचे नेतृत्व कधीच सोडत नाही. खर्गे यांचे भाषण हे त्याचेच उदाहरण आहे. भाजपच्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसने अमित शहा यांना ‘आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास’ सांगितले आहे.

Exit mobile version