बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते झाले.

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!

बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अनेक वर्षे बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे यशोगान गायले आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा सौभाग्याचा क्षण आहे. मला या कामाशी जोडले ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दांत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण प्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या कार्याची दखल घेतली.

ते म्हणाले, शिवसृष्टीच्या प्रथम टप्प्याचे लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो. देश, धर्म, स्वराज्य स्वभाषेसाठी त्यांचे जे योगदान आहे त्याला माझा त्रिवार प्रणाम. बाबासाहेब पुरंदरे यांनाही प्रणाम. १०० वर्षांच्या आपल्या आयुष्यात शिवरायांच्या यशोगानसाठी जीवन समर्पित केले. शिवरायांसाठी जीवन अर्पण केल्यामुळे आज अनेक लोकांपर्यंत शिवाजी महाराज पोहोचले. उत्तुंग अशा कर्तृत्वाला लोकांपर्यंत पोहोचविले. जाणता राजाचा गुजरातच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रयोग केला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विनंती केली होती. ८ जिल्ह्यात मी जाणता राजाचे प्रयोग केले होते. आज बाबासाहेब नाहीत, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. ट्रस्टींचे मी अभिनंदन करतो.

एकनाथजी म्हणाले, काम थांबणार नाही. शिवरायांची प्रतिष्ठाच अशी आहे, की हे काम थांबणारच नाही ईश्वरीय काम आहे, असे अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर आपली टिप्पणी केली.

शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अधिक लोकांपर्यंत आणले, अधिकृत दस्तावेजांचे जतन केले, जगभरातून भिक्षा मागून दस्तावेजांना एकत्र केले, शिवचरित्राचा इतिहास लोकांसमोर मांडला, हे बाबासाहेब पुरंदरे यांचे आमच्यावर उपकार आहेत, असे अमित शहा म्हणाले.

हे ही वाचा:

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारतर्फे खास कार्यक्रमांचे आयोजन

पी. चिदंबरम यांना झाला साक्षात्कार; मोदी सरकार इतके कमकुवत नाही

शरद पवारांनी मात्र हातच वर केले!

बाबासाहेबानी गोवा मुक्ती संग्राम, दिव दमण मुक्ती संग्राम यात योगदन दिले. देशभक्त म्हणून. शिवाजी महाराजांसाठी केलेले कार्य याचे पारडे त्यांच्या सर्व कार्यात निश्चितच जड आहे, असे कौतुकोद्गारही अमित शहा यांनी काढले.

ते म्हणाले की, हा प्रकल्प ठऱलेल्या वेळेतच होईल, याचा मला भरोसा आहे. पहिल्या टप्प्यात ६० कोटी खर्चातून शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घटना दाखविण्यात आल्या आहेत. शिवकालिन दुर्ग, शिवराज्याभिषेक, आग्रा व मुघलांच्या तावडीतून सुटण्याचा प्रसंग इथे दाखविण्यात आला आहे. इथे शिवसृष्टीत येईल तो शिवाजी महाराजांचे जीवन जाणून घेईलच पण एक प्रेरणा घेऊन जाईल.

 

Exit mobile version