एकीकडे कुस्तीपटू आंदोलक कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंह यांना अटक करण्याच्या मागणीवर ठाम असताना दुसरीकडे, या प्रकरणाला मंगळवारी वेगळेच वळण लागले. एकीकडे कुस्तीपटू त्यांनी जिंकलेली पदके गंगामध्ये बुडवण्यासाठी हरिद्वारला पोहोचले असताना दुसरीकडे एका व्यक्तीने कुस्तीपटूंवर गंभीर आरोप केले.
अमित पैलवान नावाच्या या व्यक्तीचा असा दावा आहे की, तो त्या अल्पवयीन मुलीचा काका आहे, जिचा छळ बृजभूषण सिंहने केल्याचा आरोप आहे. तसेच, या कुस्तीपटू आंदोलकाकंडून त्यांच्या कुटुंबाला भरकटवले जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. बृजभूषणसिंहवर आरोप करण्यासाठी ते या मुलीचा गैरवापर करीत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करणारे कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सिंह यांच्यावर एका अल्पवयीन मुलीसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
कार्यमुक्त करीत नसल्याने पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
कांदिवलीतील प्रेमप्रकरणातून हत्या करणाऱ्या प्रयागराज येथून अटक
राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू
अमित यांनी दावा केला की, कुस्तीपटू फसवणूक करत आहेत. त्यांच्या भावाच्या मुलीचे वय बदलून १६ वर्षे केले गेले आहे, कारण अल्पवयीन मुलींविरोधातील लैंगिक अत्याचारासंदर्भातील पॉक्सो कायदा लागू होऊ शकेल.
त्यांनी सांगितले की, मुलीचा जन्म २२ फेब्रुवारी २००४ रोजी झाला होता. त्यांनी दावा केला की, हे आंदोलक त्यांच्या कुटुंबाचा गैरवापर करत आहेत. ज्या अल्पवयीन मुलीला त्यांनी पीडित संबोधले आहे, मी त्या कुटुंबाचा असून ती माझी पुतणी तर मी तिचा काका आहे, असा दावा त्याने केला आहे.
अमित पैलवानने सांगितले की, पंजाबचे काही खेळाडू, साक्षी आणि विनेश माझ्या भावाला भरकटवत आहेत. ते नक्राश्रू ढाळत आहेत. आम्हाला न्याय हवा. राजकीय नेते आणि कुस्तीपटू सर्व ‘खेळ’ खेळत आहेत, असा आरोपही त्याने केला. ते जानेवारी-फेब्रुवारीमध्येही आंदोलनाला बसले होते. मात्र तेव्हा प्रकरण अंगाशी आले. मग त्यांनी ‘महिला कार्ड’ काढले, त्यांचा हेतू केवळ बृजभूषण सिंह यांना अटक करण्याचा आहे, असा दावाही त्याने केला.