नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागीय संचालकपदी नवी नियुक्ती करण्यात आली आहे. एनसीबी कार्यालयाकडून एका पत्राद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटे हे आता एनसीबीच्या मुंबई विभागाचे नवे संचालक असणार आहेत.
एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रात तीन अधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल माहिती देण्यात आली आहे. अमित घावटे यांची झोनल डायरेक्टर बंगळुरु आणि प्रभारी झोनल डायरेक्टर चेन्नईमधून मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बंगळुरु झोनल युनिटचा अतिरिक्त कार्यभार देखील असणार आहे.
अमित घावटे यांच्यासह अमनजीत सिंग आणि ग्यानेंद्र सिंग या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही पत्रात उल्लेख आहे. अमनजित सिंग यांची चंदीगढ एनसीबी झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ग्यानेंद्र सिंग यांची झोनल डायरेक्टर दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणीच्या तपासातून संभाषण पोलिसांच्या हाती
गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात
… म्हणून कंपनीने १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या
राज ठाकरे यांनी पत्रकारांना का हाणले ?
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य तपास अधिकारी तथा अधीक्षक व्ही. व्ही. सिंग आणि इंटेलीजेन्स अधिकारी आशिष रंजन प्रसाद या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. तपासातील त्रुटी आणि हलगर्जीपणाचा ठपका ठेवत या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.