वडील, काकांना दहशतवाद्यांनी मारले, पण शगुनने विजय मिळवून दिला रोखठोक संदेश!

नॅशनल कॉन्फरन्सच्या सज्जाद अहमद यांचा ५२१ मतांनी पराभव

वडील, काकांना दहशतवाद्यांनी मारले, पण शगुनने विजय मिळवून दिला रोखठोक संदेश!

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत असून भाजपने २९ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये जम्मू विभागातील किश्तवाड मतदारसंघातून भाजपच्या महिला उमेदवार शगुन परिहार विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, मुस्लिमबहुल भागामधून शगुन परिहार जिंकल्याने विरोधी पक्षांना धक्का बसला आहे.

१० वर्षानंतर निवडणूका झाल्याने सर्वांच्या नजरा निकाल्याकडे होत्या. आतापर्यंतच्या निकालानुसार, ९० जागांवर एनसीपी- ४७, भाजपा- २९, पीडीपी-३, आप-१, इतर-८ जागांवर विजयी झाले आहेत. यामध्ये किश्तवाड मतदारसंघातून  उभारलेल्या भाजपच्या महिला उमेदवार शगुन परिहार यांच्या विजयाची जोरदार चर्चा आहे. दहशतवादी हल्ल्यात वडील आणि काका गमावलेल्या २९ वर्षीय शगुन परिहार यांचा ५२१ मतांनी विजय झाला आहे.

किश्तवाड जागेवर भाजपकडून शगुन परिहार, नॅशनल कॉन्फरन्सकडून सज्जाद अहमद किचलू आणि पीडीपीकडून फिरदौस अहमद टाक यांना उमेदवारी देण्यात आली होती. शगुन यांना २९,०५३ तर सज्जाद अहमद यांना २८,५३२ मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या फिरदौस अहमद यांना केवळ ९९७ मते मिळाली. ७० टक्के हून जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या किश्तवाडमध्ये ५२१ मतांनी शगुन परिहार विजयी झाल्या.

हे ही वाचा : 

मुंबईकरांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

जम्मू- काश्मीरसह देशातील जनतेला कळून चुकलंय, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पर्याय

ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरविरोधात तक्रार दाखल

हिजबुल्ला मुख्यालयाचा कमांडर ठार

निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर शगुन परिहार यांनी भविष्यातील योजनांबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, सुरक्षेच्या  मुद्द्यांमुळे येथील अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. मोठ्या प्रमाणात आम्ही आमचे सैनिक गमावले आहेत, मी माझ्या वडिलांना गमावले आहे, कोणी भावाला, कोणी मुलाला गमावले आहे. येथील प्रत्येक मुलाच्या डोक्यावर वडिलांचा हात असावा, प्रत्येक घरात आनंदाचे-समृद्धीचे वातावरण राहो, परिसरात शांतता असावी, यासाठी माझा सुरवातीला प्रयत्न राहील, असे शगुन परिहार म्हणाल्या.

दरम्यान, शगुन परिहार या भाजपचे दिग्गज नेते अनिल परिहार यांच्या भाची आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात अनिल परिहार मारले गेले. याच हल्ल्यात शगुनने तिच्या वडिलांही गमावले होते.

Exit mobile version