24 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरविशेषबांगलादेशात १०० हिंदू पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले!

बांगलादेशात १०० हिंदू पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले!

सरकारी नोकरीत हिंदूंचा समावेश होणार नाही याची घेतली जातेय काळजी

Google News Follow

Related

बांगलादेशात पोलीस खात्यातून हिंदूंना हटवले जात आहे. यासोबतच नव्या भरतीमध्ये हिंदूंचा समावेश केला जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. हे सर्व काम बांगलादेशचे अंतरिम युनूस सरकार करत आहे. हिंदूंना काढून त्याठिकाणी इस्लामिक कट्टरतावाद्यांना भरती करण्यात येत आहे.

हे सर्व दावे वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आले आहेत. बांगलादेशच्या पोलीस प्रमुखांनाही यासाठी सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. जनसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशमध्ये अलीकडेच १०० हिंदू पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून हटवण्यात आले आहे.

हे अधिकारी आयजी, डीआयजी, एसपी आणि एसएसपी अशा पदांवर तैनात होते. त्यांच्याकडे जिल्ह्यापासून मोठ्या विभागापर्यंतची जबाबदारी होती. त्यांच्या जागी असे अधिकारी आणले जात आहेत जे इस्लामिक कट्टरतावादी आहेत. हे नवे अधिकारी जमात-इस्लामीशी संबंधित असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

दक्षिण कोरियाचे विमान कोसळण्याआधी काय घडले ?

पायांना स्पर्श केला तर काम करणार नाही; खासदाराच्या कार्यालयात अनोखा फलक

इस्रोचे स्पाडेक्स मिशन आजपासून

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजींच्या मृत्यूचे कारण हत्या की आत्महत्या?

हिंदू अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. याशिवाय पोलीस दलात आणखी हिंदूंची भरती होणार नाही याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी नुकतीच एक भरती रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. बांगलादेशात शेख हसीना सरकारच्या काळात ७९००० पोलीस दलाची भरती गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती, आता ती रद्द करण्यात आली आहे.

त्यामुळे १५०० हिंदू उमेदवारांचे अर्जही रद्द करण्यात आले आहेत. त्याच्या जागी नवीन भरती होणार आहे. त्यात हिंदू उमेदवार घेतले जाणार नसल्याचा दावा केला जात आहे. या आदेशासाठी बांगलादेशचे पोलीस प्रमुख आयजीपी बहारुल इस्लाम यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पात्र असूनही हिंदूंची निवड केली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यानंतर हिंदूंचा सातत्याने छळ होत आहे. भारत सरकारने नुकतेच संसदेत सांगितले होते की, बांगलादेशातून अशा २२०० घटना समोर आल्या आहेत, ज्यात हिंदू किंवा इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले आहे. दरम्यान, अजूनही अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा