अजमेर शरीफ दर्ग्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर

खादीम सय्यद जीशान चिश्ती यांच्याकडे चादर सुपूर्द

अजमेर शरीफ दर्ग्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर

देशातील अनेक मशिदी ही हिंदूंची मंदिरे असल्याचे समोर आले आहे, येत आहे. अनेक मशिदींमध्ये हिंदूं मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हिंदू संघटनांच्या दाव्या आणि मागणीनंतर अनेक मशिदींमध्ये तपासणी सुरु आहे. याच मालिकेत राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती दर्ग्याच्या जागी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत वाद सुरु असून हे प्रकरण सध्या न्यायालयात आहेत. तत्पूर्वी, अजमेर दर्ग्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे.

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरूस लवकरच सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली आहे. ही चादर खादीम सय्यद जीशान चिश्ती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ठाकरेंच्या मात्रोश्री निवासस्थानी ही चादर सुपूर्द करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

सांस्कृतिक उत्थानासाठी नव्या वर्षात मुंबईत होणार हिंदू आध्यात्मिक सेवा मेळावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवरील व्याख्यानाने उलगडला इतिहास!

भारतविरोधी दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता

सुप्रिया ताई गोवारी हत्याकांड विसरलात का?

दरम्यान, अजमेर शरीफ दर्गा-मंदिर प्रकरणी शुक्रवारी (२० डिसेंबर) दिवाणी न्यायालयात दुसऱ्यांदा सुनावणी झाली. याचिकाकर्ते आणि इतर पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील निर्णयाची तारीख २४ जानेवारी दिली आहे.

Exit mobile version