माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) सोडण्याची घोषणा केली आहे.विशेष म्हणजे जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर पक्षात सामील होऊन रायुडूला १० दिवसही झाले न्हवते.२८ डिसेंबर रोजी वायएसआर काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ४५ दिवसीय क्रीडा महोत्सव ‘अधुधम आंध्र’ (चला आंध्र खेळू) सुरू केल्यानंतर दोन दिवसांनी अंबाती रायुडूने ही घोषणा केली आहे. स्थानिक वृत्तानुसार, क्रीडा महोत्सवाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करूनही रायडूने क्रीडा महोत्सवात भाग घेतला नाही.अंबाती रायुडूने ट्विटरवर पोस्ट करत वायएसआर काँग्रेस पार्टी सोडत असल्याचे सांगितले.रायुडूने पोस्टमध्ये लिहिले की, प्रत्येकाला कळवत आहे की मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.पुढील कारवाई योग्य वेळी कळवली जाईल, असे रायुडूने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे ही वाचा:
भारत-नेपाळ संबंधांना मिळाली नवी ‘ऊर्जा’ ; जलविद्युत मेगा करार
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० तोफगोळे डागले
हिजबुलचा वॉन्टेड दहशतवादी जाविद अहमद मट्टू दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!
राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार
दरम्यान, वायएसआरसीपी पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रीडी यांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी अंबाती रायुडूचे पक्षात स्वागत केले होते.आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दीरेड्डी मिथुन रेड्डी यांनी देखील रायुडूचे स्वागत केले होते. सुरवातीला रायुडूने काँग्रेस पक्षात जाण्याचे संकेत दिले होते.परंतु शेवटी वायएसआरसीपी पक्षात प्रवेश केला.मात्र, शेवटी काही काळ राजकारणापासून दूर राहणार असल्याचे सांगत अंबाती रायुडूने वायएसआर काँग्रेस पार्टीतून बाहेर पडले आहेत.
मूळचा गुंटूरचा रहिवासी असलेल्या रायुडूने जुलै २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि मे २०२३ मध्ये इंडियन प्रिमियर लीगमधून निवृत्ती घेतली.माजी भारतीय क्रिकेटपटूचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय(ODI)मध्ये उत्कृष्ट विक्रम आहे, त्याने देशासाठी ५५ सामने खेळले आहेत.रायुडूने ४७.०५ च्या सरासरीने एकूण १६९४ धावा केल्या आहेत तर नाबाद १२४ ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.