भारतातील अग्रगण्य उद्योगपती आणि रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना Z+ (झेड प्लस) सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेच हे आदेश दिले आहेत.
ही सुरक्षा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही उपलब्ध व्हावी असे या आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे अंबानी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण प्रचंड गाजले होते. त्या प्रकरणाने राज्यातील राजकारणाची दिशाच बदलून टाकली. त्यानंतरही अंबानी कुटुंबियांना काही धमक्याही आल्या. ज्यात बॉम्बस्फोट करून घर उडवून देण्याची धमकीही देण्यात आली.
मुकेश अंबानी हे जगातील एक आघाडीचे उद्योगपती आहेत. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश वरच्या क्रमांकात होतो. भारताच्या दृष्टीने ही एक अभिमानाची बाब आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असावा.
हे ही वाचा:
देशभरात गाजत असलेल्या उमेश पाल हत्येचा कट ‘मुस्लिम होस्टेल’मध्ये शिजला…
लंडनमधील त्या भारतविरोधी बैठकीत सामील झालेला नेता कोण?
कर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार
काश्मिरी हिंदू संजय शर्माला मारणाऱ्या दहशतवाद्याला घातले कंठस्नान
अर्थात या सुरक्षेचा संपूर्ण खर्च अंबानी यांनाच करावा लागणार आहे. तरीही सर्वोच्च न्यायालयाने ही सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिल्यामुळे सरकारकडून ही सुरक्षा आता त्यांना दिली जाईल.
गेल्या काही वर्षांत अंबानी यांच्या उद्योगाची कमान चढतच चालली आहे. अदानी आणि अंबानी या उद्योगपतींनी भारतीय उद्योगविश्वावर राज्य केले आहे. त्यामुळे त्यांना एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वाभाविकच त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.