संशोधन क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचा इस्रो, इन-स्पेससोबत करार

क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे सहकार्य मिळणार

संशोधन क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचा इस्रो, इन-स्पेससोबत करार

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्लूएस), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (इन-स्पेस) यांच्यात एक महत्त्वपूर्ण असा करार झाला आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे सहकार्य देण्यासाठी या तीन संस्थांमध्ये करार करण्यात आला आहे.

संशोधन क्षेत्रातील नव्या कल्पनांना क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे सहकार्य मिळावे या उद्देशाने अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने इस्रो आणि इन-स्पेससोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या सहयोगाद्वारे, अंतराळ संशोधन क्षेत्रातील स्टार्टअप, संशोधन संस्था आणि विद्यार्थी यांना अत्याधुनिक क्लाउड तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रातील विकासाला गती मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

‘इंडिया’ गट काही टीव्ही अँकरवर बहिष्कार घालणार

‘ब्लू डार्ट’च्या सेवेचे नवे नाव; आता डार्ट प्लस नव्हे ‘भारत डार्ट’

व्यावसायिक हेमंत पारीख अपहरण प्रकरणी राजस्थानातील टोळीला अटक

इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम

या करारानुसार, ‘एडब्लूएस ’ स्टार्टअपना नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास आणि उत्पादन किंवा सेवांचे व्यावसायिकीकरण करण्यास मदत करेल. ‘एडब्लूएस’च्या स्पेस ऍक्सिलरेटर उपक्रमाचाही स्टार्टअपना लाभ होईल. अंतराळ संशोधन तंत्रज्ञान आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यांच्यातील अमर्याद क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली असून, स्टार्टअप, विद्यार्थी व संशोधकांना जागतिक अंतराळ संशोधन उद्योगात योगदान देण्यासाठी सक्षम करण्यास लाभ होईल, असे मत ‘इन-स्पेस’चे संचालक डॉ. विनोद कुमार यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version