अखेर ऍमॅझॉनने मागितली भारतीयांची बिनशर्त माफी

अखेर ऍमॅझॉनने मागितली भारतीयांची बिनशर्त माफी

ओटीटी वाहिनी असलेल्या ऍमॅझॉन प्राईम या वाहिनीवरून तांडव ही वेबसिरीज प्रसारित झाली होती. मात्र यातील काही दृश्यांमुळे ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यावरूनच अखेरीस ऍमॅॅझॉनने दुखावल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयाची बिनशर्त माफी मागितली आहे.

हे ही वाचा:

महिला अत्याचार प्रकरणी, पोलिसांचे मंत्र्यांच्या पावलावर पाऊल

या वर्षीच तांडव ही वेबसिरीज प्रसारीत झाली होती. मात्र यातील काही दृश्यांमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने या सिरीजचा जोरदार विरोध केला होता. हे प्रकरण न्यायलयात देखील गेले होते. मात्र आता ऍमॅझॉनने दुखावल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयाची बिनशर्त माफी मागत असल्याचा मेसेज प्रसिद्ध केला आहे.

या मेसेजमध्ये प्रेक्षकांना यातील काही दृश्ये आक्षेपार्ह्य वाटल्याबद्दल खेद व्यक्त करतो असे म्हटले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कधीच हेतू नव्हता आणि यातील आक्षेपार्ह्य वाटणारी दृश्ये काढून टाकण्यात आली असल्याचे देखील त्यांनी या संदेशात म्हटले आहे. हा संदेश काही लोकांनी ट्वीट देखील केला आहे.

भारतात सध्या असलेल्या अनेक लोकप्रिय ओटीटी वाहिन्यांपैकी ऍमॅझॉन प्राईम ही देखील वाहिनी आहे. नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार, ऍमॅझॉन प्राईम इत्यादी यांच्यावरील विविध सिरीज वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त राहिले आहेत. याची दखल घेऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वाहिन्यांसाठी नियमावली जाहिर केली आहे.

Exit mobile version