खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

हवामान खात्याकडून येत्या २४ तासांत बिहार आणि तेलंगणा वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू- काश्मीरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील चमोली येथे डोंगरावरून दगड पडल्याने बद्रीनाथ महामार्गही बंद आहे. गेल्या १० दिवसांत हा महामार्ग चौथ्यांदा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने येत्या २४ तासांत बिहार आणि तेलंगणा वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

उत्तराखंडमधील धारचुलामध्ये शुक्रवारी ढगफुटीत पूल वाहून गेला. एका गावात २०० लोक अडकले आहेत. बचावासाठी जाणारी एसडीआरएफची टीमही अडकली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये गुरुवारी वीज पडून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यासोबतच दक्षिणेतील केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. कन्नूर, कासारगोडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलप्पुझा येथील सखल भाग जलमय झाला आहे. इथे रस्त्यांवर बोट चालवावी लागली. एक हजाराहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; सहा गुन्हे दाखल

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले

बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत होता

मुंबईच्या पूर्व उपनगरातून ८० सराईत गुन्हेगार हद्दपार

देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Exit mobile version