‘मुंबई इंडियन्सबरोबरच गुजरात टायटन्सलाही बुडवले’

हार्दिक पंड्यावर आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य

‘मुंबई इंडियन्सबरोबरच गुजरात टायटन्सलाही बुडवले’

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले होते. पुढच्याच वर्षी आयपीएल २०२३ मध्ये उपविजेतेपदावर गुजरातला समाधान मानावे लागले. पण या मोसमात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून विकत घेऊन रोहित शर्माच्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली. मात्र, यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. हार्दिने फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच कर्णधारपदावरही फारशी चांगली कामगिरी केलेली नाही, मुंबईच्या चाहत्यांच्या पदरी फक्त निराशात पाडली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ दोन विजय मिळवले आहेत. तर ४ सामने गमावले आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने हार्दिक पंड्यावर केलेले ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आकाश चोप्राने ट्विटमध्ये म्हटलं आहे, मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्याचा काडीचाही उपयोग झालेला नाही. हार्दिक पंड्याशिवाय गुजरात टायटन्सही संघर्ष करताना दिसत आहे. कदाचित हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा भाग असता तर गुजरातला एवढा संघर्ष करावा लागला नसता. त्याविरुद्ध मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्याचा फायदा मिळू शकलेला नाही, असे आकाश चोप्राचे म्हटलेले आहे. सोशल मीडियावर आकाश चोप्राचे हे ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटवर सोशल मीडिया युजर्स सातत्याने कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!

२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!

‘मुर्शिदाबाद हिंसाचाराची एनआयए चौकशी करा’!

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत

गुणतालिकेत मुंबई इंडियन्स कुठे आहे?
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ ६ सामन्यांत ४ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत या संघाने केवळ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवला आहे. परंतु गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या सलग पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Exit mobile version