ऑलिंपिक उद्घाटन सोहळा उद्या (२३ जुलै) रोजी होणार असताना ऑलिंपिकच्या बोधवाक्यात ‘टुगेदर’ हा शब्द देखील जोडला गेला आहे. ऑलिंपिकच्या मागच्या १२७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा मोठा बदल करण्यात आला आहे.
इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीने हा बदल स्वीकारला आहे. यापूर्वी ऑलिंपिकचे बोधवाक्य ‘सायटस, आल्टियस, फोर्टियस’ म्हणजे वेगवान, उच्चतम आणि शक्तिशाली (फास्टर, हायर अँड स्ट्राँगर) हे होते. त्यात आता टुगेदर अर्थात एकजुट यासाठीचा लॅटिन भाषेतील शब्द वापरला जाणार आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?
लडाखच्या विकासासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
कोकणासाठी पूर्वनियोजन नाही; राज्य सरकार बेफिकीर
संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारकडून ‘ही’ नवी सुधारणा
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने कम्युनिटर या लॅटिन शब्दाची निवड केली होती. परंतु त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये कम्युनिस असा शब्द प्रचलित झाला आहे. यापूर्वीचे बोधवाक्य १८९४ मध्ये निर्माण करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा फ्रेंच संस्थापक सदस्य पिए डी कोटिन याचा मित्र हेन्री डिडोन याने पहिले बोधवाक्य दिले होते. त्यात तब्बल १२७ वर्षांनंतर बदल करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात एकजुट हा शब्द बोधवाक्यात जोडून घेणे ही एक विचित्र विरोधाभास आहे. सध्याच्या काळात सर्व खेळाडूंना वेगवेगळं रहावं लागत आहे, त्याबरोबच स्पर्धा देखील दर्शकांशिवाय घेतल्या जात आहेत. खेळाडूंना देखील रात्री ८ वाजल्यानंतर बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु संपूर्ण जग एकत्र येऊन कोरोनाचा सामना करत आहे. त्यामुळे या काळाला अनुसरून एकजूट हा शब्द देखील ऑलिंपिकच्या बोधवाक्यात घेण्यात आला आहे.