सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे क्षयरोग, कोरोना यासारख्या विविध आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हा मुद्दा लक्षात घेऊनच महापालिका सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास महापालिका २०० रुपये दंड आकारत आहे.
गेल्या सुमारे नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये १९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल ३९ लाख १३ हजार १०० इतक्या रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे अशी माहिती उप आयुक्त (डॉ.) श्रीमती संगीता हसनाळे यांनी दिली आहे.
कुर्ला परिसरातील ‘ए’ विभागातून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ‘ए’ विभागातील दंड वसुलीतून आलेली रक्कम ही ६ लाख १५ हजार ८०० रुपये इतकी आहे. ‘एल’ विभागातून ६ लाख १२ हजार २०० रुपये वसूल करण्यात आले, तर ४ लाख ५२ हजार २०० रुपयांची दंड वसुली झाली.
हे ही वाचा:
हास्यजत्राचे कलाकार होणार करोडपती
हिरोशिमा, योशिनोरी आणि ऑलिम्पिक
नोकरभरतीचा होतोय उच्चांक! जाणून घ्या कारण…
हातमाग दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘या’ ट्विटला दिली पसंती
एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. तीव्र कारवाईसोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत असे पालिकेद्वारे सांगण्यात आले. वारंवार हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, मुखपट्टी वापरावी आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.